*सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बिर्ला; उपाध्यक्षपदी शरद जाधव*
पुणे, दि. १० मे : सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला यांची तर सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन प्रमुख शरद जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. संजय बिर्ला (अध्यक्ष), शरद जाधव (उपाध्यक्ष) यांच्याबरोबरच सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी तसेच सहकार, बँकिंग आणि पतसंस्था क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ असलेले सर्वश्री डॉ. मुकुंद तापकीर, अमित ओझे, सदानंद पावगी, सीए शिरीष गोडबोले, सीए रविंद्र चिंचवडकर, उदय पेंडसे, पांडुरंग राऊत, शिवाजीराव पाटील, सौ. संध्या कुलकर्णी, सौ. उर्मिला प्रभूघाटे यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उमेश मोहिते यांनी कामकाज पाहिले. यावेळी प्रशिक्षण प्रमुख म्हणून व्यंकटेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
2004 साली स्थापन झालेल्या या प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाने शिखर प्रशिक्षण संस्थेचा दर्जा दिला असून राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना, त्यांच्या कर्मचारी व संचालकांना प्रशिक्षण देण्यात येते. सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणातील गुणांसाठी सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.
———————–
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
PUNE24 NEWS Jayshree Dimble 9623968990 / 9689934162