डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी गोकुळ दुध संघांचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ. चेतन नरके, चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे, जाफा कॉम्फीडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वाघ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती संयोजक, बेनिसन मीडियाच्या प्राची अरोरा व सहयोगी आनंद गोरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष डॉ. सुजीत कुलकर्णी, जाफा कॉम्फीडचे उपाध्यक्ष एडी नाथ, गोकुळ दूधचे विक्री व पणन अधिकारी सुजय गुरव, चितळे बंधू मिठाईवाले येथील संशोधन अधिकारी डॉ. वैभवी पिंपळे आदी उपस्थित होते. बेनिसन मीडियातर्फे आयोजित प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष आहे.

या प्रदर्शनात अभ्यासपूर्ण सेमिनार्स, वर्कशॉप्स, चर्चासत्रांसह गोठा व्यवसाय, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, क्लीन मिल्क प्रोडक्शन, लॅबोरेटरी सेटअप, लॅब तपासणीच्या पद्धती, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, पॅकेजिंग व साठवणूक तंत्रज्ञान, डेअरी प्रॉडक्ट्स निर्यातीमधील संधी, डेअरी व्यवसाया व आयातनिर्यात, पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान, मशीनरी सेट-अप, कच्च्या मालाची निवड व फॉर्मुलेशन, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केटची स्थिती अशा डेअरी व पशुखाद्य निर्मिती उद्योगासंबंधीच्या देशविदेशामधील सुमारे १०० कंपन्यांच्या मशिनरींची प्रात्यक्षिके पाहता येतील. तज्ञांसोबत थेट संवाद साधून या क्षेत्रातील अर्थकारण समजून घेता येईल. तसेच शासकीय योजना व कायदेशीर बाबीचीही माहिती घेता येईल, असे प्राची अरोरा यांनी नमूद केले.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

*बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

  *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण* पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या

Spread the love
Read More »