दहा दिवसांमध्ये किर्लोस्करने गाठले लक्ष्य
किर्लोस्कर ब्रदर्सच्या शेअरची किंमत २१०० रुपये; अॅक्सिस सिक्युरिटीज निर्धारीत केलेले लक्ष्य दहा दिवसांमध्ये पूर्ण
पुणे-मुंबई : किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) कंपनीने चालू अर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये लक्षणीय तेजी पहायला मिळाली आहे. अॅक्सिस सिक्युरीटीज या शेअर ब्रोकरने दिलेल्या अहवालामध्ये किर्लोस्करच्या शेअर्स वाढीचे टारगेट अवघ्या दहा दिवसांमध्ये पूर्ण झाले असून शेअर्सने २१०० रूपयांची पातळी गाठली आहे. या मुळे आता अॅक्सिसकडून किर्लोस्करच्या शेअरला ‘होल्ड’च्या ऐवजी ‘बाय’चा दर्जा देण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देशातील अनेक प्रमुख कंपन्यांनी अर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निकालाममध्ये केबीएलने दमदार कामगिरी केली. कंपनीचा महसूल १३ टक्क्यांनी वाढला असून या वाढीचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत असलेली मजबूत मागणी, हे आहे. कंपनीचा एबिटडा ६१ टक्क्यांनी वाढला आहे. या कामगिरीमुळे शेअरबाजारातही कंपनीच्या शेअरची किंमत वधारली असून अॅक्सिस सिक्युरीटीजच्या अहवालात येत्या काळात हा शेअर आणखी वधारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मुळे गुंतवणूकदारांनी हा शेअर घ्यावा, यासाठी अॅक्सिसकडून ‘बाय’चा दर्जा देण्यात आला आहे. शेअर बाजारात केबीएलच्या शेअरच्या कामगिरीसाठी निर्धारीत केलेले टारगेट दहाच दिवसांमध्ये पूर्ण झाल्याने भविष्यात हा शेअर आणखी ऊंची गाठेल, असा विश्वास अॅक्सिस सिक्युरीटीजकडून व्यक्त करण्यात आला आहे.
———————-
दहा दिवसांमध्ये शेअरची किंमत १८०० वरून २१००
केबीएलने दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत १८१२ रूपये इतकी होती. त्यानंतर हा शेअर चांगली कामगिरी करेल, असा विश्वास अॅक्सिस सिक्युरीटीज कडून व्यक्त करण्यात आला होता. त्यासाठी अॅक्सिसकडून २१०० रूपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आली होती. हे लक्ष्य एक वर्षाच्या कालावधीसाठी असते. परंतु, दहाच दिवसांमध्ये केबीएलने २१०० चा टप्पा पार केल्याने पुढच्या काही महिन्यांमध्ये हा शेअर आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
———————–