ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या महिलांचे स्नेहसंमेलन प्रोलाईफ कँसर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संपन्न

*ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या महिलांचे स्नेहसंमेलन प्रोलाईफ कँसर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संपन्न*

रुग्णांनी इच्छाशक्ती आणि सकारात्मकता दाखविली तर कर्करोगाचा रुग्ण निश्चित बरा होतो._

महिला स्नेहमेळाव्यात डॉ. सुमित शहा यांचे प्रतिपादन_

पुणे : प्रोलाईफ कँसर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दहा ते बारा वर्षांपूर्वी उपचार घेतलेले काही रुग्ण असून ते ठणठणीत आहेत व इथे आले आहेत. कारण उपचारांबरोबरच रुग्णाची इच्छाशक्ती, कुटुंब आणि नातेवाईक हे यांचा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. रुग्ण बरा झाला की त्याला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगता यायला हवे, त्यासाठी कर्करोग रुग्णाला सहानुभूती दाखवू नका. आज तुम्ही जे जमलेले आहात हे ‘गॅदरिंग ऑफ स्ट्रेंथ’ आहे. हीच सकारात्मक ताकत नवीन रुग्णाला ऊर्जा देते, असे मत गुलटेकडी येथील प्रोलाईफ कँसर सेंटरचे लॅप्रोस्कोपीक कॅन्सर सर्जन डॉ. सुमित शहा यांनी व्यक्त केले.

प्रोलाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिटय़ूट आयोजित स्तन कर्करोगाच्या प्रवासातील साहसी महिलांचा स्नेहमेळावा मंगळवारी दि. 22 रोजी गुलटेकडी प्रोलाईफ कॅन्सर सेंटर व रिसर्च इन्स्टिट्युट येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. स्तनांच्या कर्करोगाचा सामना करून उभ्या राहिलेल्या बहादुर महिलांच्या प्रवासाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास दृढ करण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्करोगामधून बरे झालेले रुग्ण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व कर्करोगतज्ज्ञ डॉ. शोना नाग म्हणाल्या की जीवनशैली पूर्वीप्रमाणे सुरू ठेवा प्रोटीन डायट घ्या. पालेभाज्या, जिरे, हळद महत्वाची. तसेच उसळ मटकी, डाळी, बाजरी नाचणी राजगिरा खा. जिम करा. उपचार झालेल्या हाताची काळजी घ्यावी. भारतीय महिला या परिवाराच्या काळजी बाबत जागरूक असतात तसेच त्यांनी स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे.

यानंतर कर्करोग फिजिओथेरपिस्ट रेणुका देशपांडे, यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, कर्करोग झाल्यावर आराम करायला हवा असे सांगितले जाते. परंतु असे काही नाही. या रुग्णाला फिजिओथेरपी फार महत्वाची असते. व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. स्टॅमिना वाढतो. व्यायाम करा, काही पाऊले चाला. कितीतरी बॉलिवूड ऍक्टर्स आहेत त्या बऱ्या झाल्या आहेत. किमोथेरपी सुरू झाल्यावर लगेच मेनोपॉज सुरू होतो. ज्या महिलांना वयाच्या 30 ते 35 मध्ये कर्करोग होतो त्यांना लवकर पाळी बंद होते. त्यामुळे हाडे ठिसूळ व्हायला लागतात. व्यायाम केला की थकाल आणि झोप चांगली लागते.

यावेळी कर्करोग रुग्ण रेखा शहा अनुभव सांगताना म्हणाल्या, “2020 मध्ये मणका आणि स्तनाला कर्करोगाचे निदान झाले. मणक्याला रेडिएशन झाले. मला डॉ सुमित यांचा खूप उपयोग झाला. मी दर तीन महिन्याला प्रोलाईफ कँसर सेंटरला येते. सकारात्मक राहते. मी आनंदी आहे. घरी सर्व काम करते. यावेळी इतर रुग्ण शमा घुगे, शहाजहान इनामदार यांनीही त्यांचे अनुभव व्यक्त केले.

रुग्णाचे नातेवाईक ममता कांबळे म्हणाल्या की, माझ्या आईला गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले. आम्ही डॉ. सुमित शहा यांच्याकडे उपचार केले. पण आई खूप सकारात्मक होती. ती खूप कणखर आहे. उपचार इतके छान झाले की असे वाटले नाही की तिला कर्करोग आहे. हा शेवटचा टप्पा नाही त्यापुढेही जीवन जगू शकतो.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »