मणप्पुरम फायनान्सने दिवाळीनिमित्त ‘हॅपीनेस पसरवा’ गोल्ड लोन मोहिम सादर केली
पुणे : मणप्पुरम फायनान्स, भारतातील आघाडीची गोल्ड लोन कंपनी, दिवाळीसाठी ‘हॅपीनेस पसरवा’ या शीर्षकाखाली नवीन जाहिरात मोहिम घेऊन आली आहे. ही मोहिम मणप्पुरम फायनान्सच्या गोल्ड लोन सेवांद्वारे कर्ज घेणे कसे सोपे आणि जलद आहे, हे अधोरेखित करते, ज्यामुळे ग्राहक सोने गहाण ठेवून त्वरित निधी मिळवू शकतात.
गोल्ड लोनची माहिती वाढवून भारतातील ग्राहकांमध्ये याची स्वीकृती वाढवणे हा मोहिमेचा उद्देश आहे, आणि ती विविध सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, आसामी, मराठी, कन्नड, आणि ओडिया अशा आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना, मणप्पुरम फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही.पी. नंदकुमार म्हणाले, “सोप्या प्रक्रियेद्वारे ग्राहक मणप्पुरम गोल्ड लोनचा वापर करून सहजतेने कर्ज मिळवू शकतात. सोनं हे आपल्यासाठी संकटाच्या वेळी महत्त्वाचं असलेलं मूल्यवान साधन आहे. याच गरजा पूर्ण करण्यासाठी, मणप्पुरम फायनान्स, गोल्ड लोन क्षेत्रातील दशकांपासूनचा अनुभव घेऊन, नाविन्यपूर्ण उपाय देण्यास तत्पर आहे.”
मणप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल: मणप्पुरम फायनान्स लिमिटेड ही भारतातील आघाडीची गोल्ड लोन एनबीएफसी असून ती घरगुती वापरातील सोने गहाण ठेवून कर्ज पुरविण्याचं काम करते. १९९२ साली स्थापन झालेली ही कंपनी श्री. व्ही.पी. नंदकुमार (सध्याचे एमडी आणि सीईओ) यांच्या नेतृत्वाखाली चालते, ज्यांच्या कुटुंबाचा १९४९ पासून गोल्ड लोन व्यवसायात सहभाग आहे. कंपनीचे मुख्यालय केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वलापड येथे आहे. कंपनीने १९९५ साली शेअर बाजारात प्रवेश केला आणि तिचे शेअर्स मुंबई, चेन्नई, आणि कोचीच्या शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध आहेत.