पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी

 

*पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी*

शहर वाढलीत, तशी वाहतूक समस्याही वाढायला सुरूवात झाली. तो एक काळ होता, त्या काळात पुण्याचे प्रवेशद्वार समजणाऱ्या जाणाऱ्या ‘चांदणी चौक’ प्रदुषणामुळे गुदरमला होता. मुंबईकडून पुण्यात येणं किंवा हायवे लागून मुंबईकडे जाणं म्हणजे दिव्य होतं. याच चौकात सदैव वाहतूक कोंडी धुळ आणि धुराचे साम्राज्य यामुळे जनता त्रस्त होती. मुंबईला जायला जितका वेळ लागतो तितका वेळ या चौकातून लागतो असे विनोद केले जायचे. याच वाहतुक कोंडीचा त्रास दूर व्हावा, यासाठी पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री ‘चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गे हा प्रश्न निकाली काढला. याच पुण्याच्या विकासाला नवा आयाम देणाऱ्या ‘चांदणी चौक’ उड्डाणपुलाच्या उभारणीची ही कहाणी….

12 ऑगस्ट २०२३, वार शनिवार, सकाळी दहा वाजता.. हीच ती तारीख, ज्या तारखेला पुणेकरांना दिलासादायक बाब ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन झालं आणि येथील ये-जा करणाऱ्या लोकांसह येथील रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला. आठ रॅम्प, दोन अंडरपास, चार पूल, दोन सेवा रस्ते, असे मिळून सुमारे १७ किमी लांबीच्या रस्त्यांनी ‘चांदणी चौका’चा चेहरा-मोहरा बदलला. सुमारे ८६५ कोटी रूपये खर्च करून ५० वर्षाचा विचार करून साकारलेला हा प्रकल्प. आधी ३० ते ३५ हजार वाहनांची क्षमता असणाऱ्या याच मार्गावर आता दिवसाला दीड लाख वाहने सुसाट धावताहेत..याच चांदणी चौकाच्या प्रकल्पाच्या मुळ प्रस्तावात पादचारी पूलाचा समावेश नव्हता. त्यामुळं पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावं लागत असे. असे करतांना अपघाताची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री नात्याने चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार पाषाण ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूरीसाठी पाठविण्यात आला. आणि तो मंजूरही झाला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या कामाचा आता सगळीकडून कौतूक केले जात आहे.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

*बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

  *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण* पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या

Spread the love
Read More »