पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन केले; रवीन ग्रुपला (Ravin Group) मेट्रो 3 च्या विद्युतीकरणामध्ये भागीदार असल्याचा अभिमान आहे.

रवीन ग्रुप मेट्रो लाईन 3 (Metro Line 3) तसेच बांधकाम सुरू असलेल्या इतर मेट्रोजसाठी अत्यंत विशिष्ट अग्निशामक बचाव आणि इतर विद्युत केबल्सच्या पुरवठा आणि स्थापनेच्या देखरेखीकरता अधिक पसंतीचा आणि विश्वासपूर्ण भागीदार म्हणून काम करत आहे.

• रवीन ग्रुपने मुंबई, पुणे आणि जम्मू-काश्मीरमधील मेट्रो प्रकल्पांसाठी ज्या उत्पादनांचा पुरवठा केला आहे तो एकूण 300 कोटी रुपयांचा आहे.

• या प्रोजेक्ट्समध्ये “इग्नामो” केबल्सचा वापर करण्यात आला होता. ते या प्रोजेक्ट्ससाठीचे अतिशय महत्त्वाचे व आवश्‍यक घटक होते. “इग्नामो” केबल्स विशेषकरून अग्निप्रतिकारक म्हणजेच फायर सेफ आणि फायर सर्व्हायव्हल अशा केबल्स आहेत. ही सर्व काळजी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेतली गेली.

• रवीन ग्रुपने या समर्पित प्रोजेक्ट्सना 3000 किलोमीटरपेक्षा जास्त केबल्स पुरविल्या आहेत.

पुणे : मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) किंवा एक्वा लाईन (Aqua Line) प्रोजेक्टच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी योगदान देण्याकरता सहयोगी आणि भागीदार असल्याचा रवीन ग्रुपला अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 5ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक भूमिगत मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले तेव्हा हा अभिमानाचा क्षण होता. या मेट्रो लाईनचे कामकाज व सेवा सुरू करण्यासाठी सर्व आव्हाने आणि अडथळे दूर करण्याकरता अथक परिश्रम घेणाऱ्या महाराष्ट्र सरकार, मुंबई मेट्रो आणि सर्व एजन्सीज आणि व्यक्तींचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो.

या उपक्रमातून भारताचे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्ये अधोरेखित होते. मुंबई शहराच्या परिवहन क्षेत्रात हे महत्त्वाचे बदल होत आहेत आणि हे परिवर्तन प्रगतीकडे वाटचाल करणारे आहे. आम्हाला त्यात भाग घ्यायला मिळत असल्यामुळे नम्र आदर आणि खूप अभिमान वाटतो. येथे गुणवत्ता, सुरक्षितता आणि विश्वसनीयता आवश्यक मानली जाते आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. 

बऱ्याच काळापर्यंत, विशिष्ट अग्निशामक बचाव उत्पादने भारतात तयार केली जात नव्हती. परंतु रवीनने या आव्हानांवर मात केली. त्यांनी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू केली. त्यांनी सिप्झ ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पर्यंत भूमिगत पट्ट्यातील फेज 1 आणि नंतर फेज 2 मधील कुलाबापर्यंत काम केले. त्यात त्यांनी विशेष अग्निशामक बचाव आणि इतर केबल्सचा केवळ पुरवठा केला नाही तर त्यांच्या स्थापनेची (इंस्टॉलेशन) देखरेखदेखील केली. ही सर्व काळजी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेतली गेली.

भूमिगत मेट्रोज, बंदिस्त ठिकाणे, उंच इमारती इत्यादींमध्ये आगीच्या धोक्यांपासून जीवन आणि मालमत्ता सुरक्षित करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रवीनकडून इग्नामो फायर सर्व्हायव्हल केबल्सची रचना अशी केली गेली आहे की त्या अगदी तीव्र आग सहन करू शकतात आणि 120 मिनिटांहून अधिक काळ त्यांची सर्किट अखंडता राखतात. तसेच, हे केबल्स जळण्याच्या वेळी धूर किंवा विषारी वायू सोडत नाहीत. या केबल्सची डिझाईन, उत्पादन आणि चाचणी अत्यंत कडक मापदंडांत केली जाते. त्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ती स्थापित केली जातात. असे उच्च सुरक्षा आणि कामगिरी मानके पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासाठी केले जाते.

मुंबईच्या शहरी परिवर्तनात जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने रवीन ग्रुपच्या सहकार्याने मेट्रो लाइन 3 साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेट्रो 3 एक्वा लाईन कार्यान्वित झाली की ती प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम होण्याची खात्री होईल. रवीन ग्रुप मुंबईच्या वाढीस पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि शहर या नवीन वाहतुकीच्या युगात प्रवेश करत असताना नाविन्यपूर्ण विद्युत समाधानासाठी योगदान देण्यासदेखील तयार आहे.

रवीन ग्रुपने मुंबईत विविध अतिरिक्त हाय व्होल्टेज प्रकल्प राबविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांची ईएचव्ही ईपीसी (EHV EPC) प्रकल्पांमध्ये निपुणता आहे. त्याद्वारा त्यांनी 1800 मेगावॅटपेक्षा जास्त वीजपुरवठा केला आहे.

रवीन ग्रुप केबल उत्पादनात 73 वर्षांहून अधिक काळ असून ते जागतिक दर्जाचे केबल उपाय प्रदान करण्यात अग्रणी आहेत. ते केवळ केबल पुरवत नाहीत, तर केबलशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा, तंत्रज्ञान आणि उपाययोजना पुरवतात. कंपनीने जागतिक स्तरावर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये भागीदारी केली आहे. त्यामध्ये जम्मू बारामुल्ला रेल कॉरिडॉरचा समावेश आहे. या कॉरिडॉरचा चिनाब नदीवरचा रेल्वे पूल अभियांत्रिकीचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांनी भारतातील विविध मेट्रोज जसे पुणे मेट्रो, हैदराबाद मेट्रो, चेन्नई मेट्रो, नागपूर मेट्रो इत्यादीमध्ये भागीदारी केली आहे. दिल्ली, मुंबई आणि आता नवीन पनवेल विमानतळ, बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरसह संपूर्ण जिओ कॉम्प्लेक्स, अबू धाबीमधील खलिफा बंदर, दोहा मेट्रो रेल, भारतातील आणि आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमधील जवळजवळ सर्व प्रमुख सौर प्रकल्प, डेटा सेंटर आणि सर्व प्रमुख उद्योग आणि जीवनावश्यक सेवांमध्ये देखील भागीदारी केली आहे.

  About Ravin Group:

Ravin Group established in the year 1950, comprises of various companies managing diverse business and manufacturing facilities in India and UAE, with its expertise in the electrical energy sector. The Ravin Group management boards comprises of highly qualified professionals with significant expertise in various markets and have been pioneers of new product developments through R&D in the industry.

The Group’s values of Sustainability, Integrity and Innovation propel it to perform and excel in all spheres of activity. Ravin Group offers comprehensive solutions across 5 verticals such as Manufacturing, Renewable Energy, EHV & Accessories, Trading, EPC Services in the fields of renewables, cable laying, cable jointing and termination, building sub – stations etc.

The group’s focused approach towards project management enables the creation of world class projects and innovative solutions. With proven technical prowess in handling mega projects and superior project management expertise, the Group has powered infrastructure development in over 100 countries. Over the past decade Ravin Group with its motto of Evolving and Energizing has been instrumental in bringing new technology into the cable and allied industries, enhancing the industry knowledge base.

Ravin Group embodies the spirit of “Make in India” and “Viksit Bharat”, more particularly “Viksit Maharashtra”. The group embraces the “Trust, Safety & Sustainability” values.

Bharosa Rakho. Surakshit Raho.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर

Spread the love
Read More »

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे