कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय

@ ब्रेकिंग न्यूज @ 🟣 *कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय*  *मुंबई-* राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये, 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते पथक योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. रस्त्यावर राहणाऱ्य किंवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी … Read more

Spread the love

शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव

शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव पुणे : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला होता. असंख्य भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी शशिकांत सुतार, बापू गुडमेवार, पृथ्वीराज सुतार, डॉ. संदीप बुटाला, बेबीताई शिंदे उपस्थित होते. Spread the … Read more

Spread the love

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट

*बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट* *विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन* पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि….,  साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – … Read more

Spread the love

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान 

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला  वैशाख वणव्यापासून तमाम … Read more

Spread the love

सफाई कामगार यांना स्वच्छता सैनिकांचा दर्जा द्यावा : डॉ सुधाकर पणीकर

*सफाई कामगार यांना स्वच्छता सैनिकांचा दर्जा द्यावा : डॉ सुधाकर पणीकर* *उत्कृष्ट स्वच्छता सैनिकांना शासनाने पुरस्कार द्यावेत : संगीता तिवारी* *पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान* *पुणे -* देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे … Read more

Spread the love

सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बिर्ला; उपाध्यक्षपदी शरद जाधव यांची बिनविरोध निवड

*सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बिर्ला; उपाध्यक्षपदी शरद जाधव* पुणे, दि. १० मे : सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला यांची तर सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन प्रमुख शरद जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक बिनविरोध निवडून आले … Read more

Spread the love

कॉस्ट अकाउंटंट्स संस्थेच्या पुणे विभागाचा हीरक महोत्सव पुण्यात

*कॉस्ट अकाउंटंट्स संस्थेच्या पुणे विभागाचा हीरक महोत्सव पुण्यात* *द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण* पुणे : द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक ९ … Read more

Spread the love

श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर झळकणार

*श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर झळकणार*

*मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “अवलिया” श्री शंकर महाराज चित्रपटाचे टीज़र पोस्टर लॉन्च*

*”अवलिया” श्री शंकर महाराज चित्रपटासाठी शशि चंद्रकांत खंदारे यांचे लेखन दिग्दर्शन*

श्री शंकर महाराज हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका… त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी कधीच उपाधी लावल्या नाहीत. “अवलिया” श्री शंकर महाराज या आगामी चित्रपटातून त्यांचा जीवनपट आपल्या भेटीस येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा शंकर महाराज समाधी सोहळ्याच्या दिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले.

जयशंकर प्रॉडक्शन या निर्मितिसंस्थे अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून भाजपाचे मा.राजेंद्र (आबा) शिळीमकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शशि चंद्रकांत खंदारे यांचे असून याआधी त्यांनी अनेक महोत्सवात गौरवलेल्या “जिप्सी” या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.      

‘अवलिया’ हा चित्रपट श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्यावर असणार आहे. १८०० च्या सुमारास श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकट झाले ते १९४७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. या १५० वर्षाच्या कालखंडात त्यांनी असंख्य लीला केल्या, अगणित भक्तांना सन्मार्ग दाखवले, त्यांचा उद्धार केला. अशा आधुनिक काळातील सत्पुरुषावर सदर चित्रपट असणार आहे.

श्री सद्गुरू शंकर महाराजांवर आधारित असलेल्या बहुतांश कलाकृती मध्ये केवळ चमत्कारांवर भर देण्यात आला आहे. महाराज हे चमत्काराच्या ही खूप पुढे आहेत. त्यांनी चमत्कार हे केवळ भक्तांचे डोळे उघडण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी केले आहेत. शंकर महाराजांनी असंख्य लीला केल्या त्याच बरोबर त्यांचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक ही होता, हे विसरून चालणार नाही. महाराजांनी केलेल्या अगाध लीलांबरोबरच महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून चित्रपटातील कलाकरांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे लेखक दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांनी सांगितले.

Read more

Spread the love

बुद्ध पौर्णिमेनिमित्त रंगणार धम्म पहाट आणि धम्म संध्या

*बुद्ध पौर्णिमेनिमित्त रंगणार धम्म पहाट आणि धम्म संध्या* पुणे : जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुध्द पौर्णिमेनिमित्त  विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने शहरात धम्म पहाट आणि धम्म संध्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी  … Read more

Spread the love

*महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ३, ४ मे रोजी* *’अमृत ज्ञानकुंभ’, दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन*

*महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ३, ४ मे रोजी* *’अमृत ज्ञानकुंभ’, दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन* – केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन – ऍड. नरेंद्र सोनावणे, ऍड. प्रसाद देशपांडे यांची माहिती; देशभरातील कर सल्लागारांची उपस्थिती पुणे: महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने ‘अमृत ज्ञानकुंभ २०२५’, या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन … Read more

Spread the love
20:32